खळबळजनक... शिरूर तालुका सामूहिक बलात्काराने हादरला .... कारेगावात परप्रांतीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन दोघांनी केला सामूहिक बलात्कार

9 Star News
0
खळबळजनक शिरूर तालुका सामूहिक बलात्काराने हादरला ....
 तालुक्यात परप्रांतीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन दोघांनी केला सामूहिक बलात्कार;
शिरूर प्रतिनिधी 
       खळबळजनक... स्वारगेट पुणे येथे तर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता शिरूर तालुक्यात
कारेगाव येथे रात्रीच्या वेळेस मामेभावा बरोबर गप्पा मारत बसलेल्या १९ वर्षीय परप्रांतीय युवतीवर दोघा नराधमांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन आळीपाळीने सामूहिक बलात्कार करून अत्याचार करून तिची सोन्याची दागिने घेऊन पळून गेल्याची घटना असून रांजणगाव पोलीस स्टेशन येथे बलात्कार व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघा नराधमांना अटक केली आहे. 
       या प्रकारामुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शिरूर तालुक्यातील दत्ता गाडे नंतर आणखी दोघाजणांनी अशा प्रकारे नीच कृत्य केल्याचा निषेध सर्व थरातून होत आहे. 
पीडित तरुणी परप्रांतीय असून चारच दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे आली होती. आरोपींनी तरुण-तरुणींना बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले व त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले व त्याचाच फायदा घेऊन मुलीवर सामूहिक अत्याचार केले.
        याबाबत पीडित युतीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे .
          याप्रकरणी अमोल नारायण पोटे (वय २५ रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) व किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा संस्कृतीडेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन नाराधमांची नावे आहेत. 
       याबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १ मार्च रोजी रात्री दहा वाजता पीडित १९ वर्षीय तरुणी ही तिच्या २० वर्षीय मामे भावाबरोबर कारेगाव होऊन राहत असलेल्या रूम कडे जात असताना घरापासून काही अंतरावर एका मोकळ्या जागेमध्ये गप्पा मारत असताना रात्री अकराच्या दरम्यान एका स्कुटी दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी पिडीत युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्याचे त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढुन घेतले. त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवुन गेला आणि एकाने पिडीतेवर बळजबरीने बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्या इसमाला बोलावुन घेवुन पहिला इसम पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्या इसमाने पीडिता आणि तिच्या मामे जीवे भावाला मारुन टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला आणि पिडीतेच्या गळयातील सोन्याचे बदाम नाकातील सोन्याची रिंग चोरी करुन सामूहिक अत्याचार करून निघुन गेले.
त्यानंतर पिडीतेने घरी जावुन घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहीणीच्या पतीने ११२ वर कॉल करुन सदर प्रकाराची माहीती रांजणगाव पोलीसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी निळकंठ तिडके करत आहेत. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!