कारेगाव तालुका शिरूर येथे 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारतील आरोपींना रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकांनी दोन तासाच्या अटक केली असल्याने पोलिसांची या भागातून कौतुक होत असून आज सायंकाळी तातडीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी भेट दिली आहे.
शिरूर तालुक्यातील नुकत्याच एका तरुणाला स्वारगेट येथील 24 वर्षे तरुणीच्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली असून, या अत्याचारानंतर शिरूर तालुक्यातील गुणात गाव व शिरूर तालुका सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. हे अत्याचार प्रकरण संपूर्ण देश राज्य व जिल्ह्यात गाजले होते. विरोधकही आक्रमक झालेले आपण पाहिले आहेत.
हे प्रकरण ताजे असतानाच शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे काल एक मार्च रोजी एका 19 वर्षीय मुलीवर स्कुटीवर आलेल्या दोघांना अत्याचार केला होता. या पकरणी गुन्हा दाखल होताच रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकातील पीडितेने केलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही तपास अवघ्या अवघ्या दोन तासात संशयित आरोपींना कारेगाव येथून अटक केली आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 19 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार घटनास्थळाला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज तातडीने भेट दिली असून, काल रात्री साडेअकरा वाजता 112 नंबर वर कॉल आला होता त्या अनुषंगाने लगेचच योग्य गुन्हा दाखल केला असून, गुन्हेगारांनाही अटक केली आहे. योग्य पद्धतीने या गुन्ह्याचा तपास सुरू आहे .
पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी वैभव मोरे, उमेश कुतवळ, अभिमान कोळेकर, दत्तात्रय शिंदे, माऊली शिंदे, अजित पवार, संदीप मांड, संतोष अडसूळ व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली कोठडी सुनावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
कारेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना 7 मार्चपर्यंत शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.