सणसवाडी येथील प्रतिभा निवास बिल्डिंगमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने जाळून फोडून एटीएममधील सोळा लाख बावीस हजार रुपये रक्कम चोरून नेली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील
प्रतिभा निवास बिल्डिंगमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम असून आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास योगेश दरेकर हे एटीएम समोरून जात असताना त्यांना
एटीएम जळाल्याचे व धूर निघत असल्याचे दिसले त्यांनी याबाबतची माहिती तातडीने एटीएम व्यवस्थापक व शिक्रापूर पोलिसांना दिली त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, महेंद्र शिंदे, पोलीस हवालदार आत्माराम तळोले, कृष्णा व्यवहारे यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेत
घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असताना चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील रक्कम चोरल्याचे समोर आले.
एटीएम एजन्सीचे व्यवस्थापक देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी एटीएमची पाहणी करत माहिती घेतली असता सोळा लाख बावीस हजार रुपये चोरी केल्याचे समोर आले. याबाबत गोकुळ वसंत शिखरे (वय ३२, रा. मांजरी खुर्द आव्हाळवाडी) यांनी फिर्याद दिली, असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहे.