बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतातील गुलाबाच्या झाडांच्या पॉली हाऊसमध्ये काही दाम्पत्य वास्तव्यास असून सदर ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी दहा फूट उंचीची पाण्याची टाकी बांधलेली आहे.
पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास टाकीजवळ खेळताना सुदामाकुमार नट (वय १६) हा पाण्याच्या टाकीत पडून बुडू लागला. यावेळी शेजारील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने सर्वजण पळत आले.
त्यांनी सुदामाकुमारला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सुदामाकुमारला मृत घोषित केले. याबाबत दुधनाथ ब्रम्हमदेव लठौर (वय ३६ रा. बुरुंजवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बिघहा जि. दाउदनगर बिहार) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहेत.