येथील प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडैशनचा वतीने
१५ फेब्रुवारी रोजी शिरूर येथे मोफत सर्व रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हे महाआरोग्य शिबीर प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडैशनचा वतीने व रुबी हॉल रक्तपेढी , डॉ . मनोहर डोळे फाउंडैशन नारायणगाव यांच्या सयुंक्त विद्यमानाने रंजना शिशुपाल व अलका साबळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त होत असल्याचे
हे शिबिर शिरुर नगरपरिषद मंगलकार्यालय या ठिकाणी 15 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून या शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी मंत्री महादेव जानकर,माजी आमदार अशोक पवार, उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल उपस्थित राहणार आहेत.
या मोफत सर्व रोग निदान व आरोग्य शिबीरात डोळे तपासणी ,मोतीबिंदू उपचार शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडैशनचे अध्यश फिरोजभाई सय्यद यांनी दिली ..
यावेळी मंत्रालयातील विशेष कार्यकारी आधिकारी प्रवीण शिशुपाल , माजी अधिकारी विलास शिशुपाल ,रुस्तूम सय्यद, नगरसेवक विनोद भालेराव,आदी उपस्थित होते .
या शिबिरात रुग्णांना मोफत औषध गोळ्या व चष्मे देण्यात येणार असल्याचेही मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण शिशुपाल यांनी सांगितले.