स्वारगेट पुणे बलात्कार पण प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजीव जाधव यांनी...

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
          पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांनी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपी दत्ता गाडे याला माईक वरून आवाज देऊन मी संजय जाधव पोलीस बोलतो.. घाबरू नको मी येतोय असा विश्वास देऊन हजर होण्याचे सांगितले आणि काही वेळातच आरोपी गावातील मैदानावर आला आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले आहे. 
  याच वेळी गावातील क्रिकेटच्या मैदानावर आलेला दत्ता गाडे याला गावातील तरुण तरुण गणेश गव्हाणे व त्याच्या साथीदारांनी त्याला पकडले. 
            स्वारगेट पुणे येथील 26 वर्ष तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता गाडे हा त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट येथेच असल्याचा खात्री पुणे पोलिसांना झाली होती तर तपासांती अनेक जणांनी त्याला गावात व गावातील शेतामध्ये फिरताना पाहिला होता. त्यामुळे नाराधम दत्ता गाडे गाव सोडून गेला नाही व व तो गावातील कीर्तनालाही हजर होता तर एक दिवस अगोदर पाणी पिण्यासाठी जवळच्या बंगल्यावर गेला होता. व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना ही खात्री झाल्याने पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा गुनाट येथे दाखल करून दिवसभर येथील परिसर पिंजून काढला. दोनशेच्यावर पोलीस, अधिकारी, व व शेकडो नागरिक पोलिसांच्या मदतीला धावले. 
      आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, १०० पोलीस, ड्रोन, श्वान पथकं गावात दाखल झाले होते. २५ एकर शेतात पहाणी करुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली. यादरम्यान, जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता. रात्री साडेदहाच्या दरम्यान दत्ता गाडे नातेवाईकाच्या घरी पाणी प्यायला आला मला खूप भूक लागली आहे मी चुकलो आहे मला पोलिसात हजार व्हायचे असे त्या नातेवाईकाला सांगितले आणि पाणी पिऊन तो पुन्हा शेताकडे निघून गेला. आणि त्यानंतर ही माहिती नातेवाईकांनी पोलिसाला सांगितली आणि आरोपी जवळच आहे हे ओळखतात पुन्हा तपास पथके जोराने फिरली त्य
          त्यात 2019 साली एका गुन्ह्यात शिरूरचे पोलीस हवालदार संजू जाधव यांनी त्याला अटक केली होते. त्यामुळे त्याकाळी पासून आरोपी दत्ता गाडे याला जाधव चांगले ओळखत होते. त्याचाच फायदा घेऊन काल दिनांक 28 फेब्रुवारी मध्य रात्री एकच्या दरम्यान नातेवाईकांच्या घरी पाणी पिऊन गेल्याचे समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांनी आरोपी दत्ता गाडे याला माईकवरून मी संजू जाधव पोलीस बोलतोय दत्ता गाडे तू कुठे पोलिसांच्या स्वाधीन हो असे आव्हान केल्याने व ओळखीच्या अधिकाऱ्याने आवाज दिल्याने लपलेला आरोपी दत्ता गाडे याला थोडा धीर आला व विश्वास आला असेल आणि तो कॅनॉल च्या कडेला असलेल्या मैदानाजवळ आला त्याचवेळी तेथून गुनाट गावचे तरुण किरण गव्हाणे त्याचा मित्र त्याला पाहिले परंतु त्याच्या हातात हत्यार आहे का?
 याची पाहणी या तरुणांनी केली गाडी लाईटचा फोकस त्याच्या अंगावर मारला जेव्हा त्यांना खात्री झाली खात्री झाल्यानंतर किरण गव्हाणे यांनी जाऊन त्याला दबोचले आणि पोलिसांना पोलिसांना याची माहिती दिली. आणि जवळच असलेल्या पोलिसांनी नराधम दत्ता गाडी याला अटक करून पुण्याकडे घेऊन गेले.
     या गावातील पोलीस पाटलानेही याबाबतची प्रतिक्रिया दिली. पोलीस त्याला शेतातून बाहेर येण्यासाठी आवाहन करत होते. मी पोलीस पाटील असल्याने मला वरिष्ठांनी सांगितल्यानंतर मीही त्याला ड्रोनच्या माध्यमातून आवाज दिला. माझ्या नंतर शिरूर पोलिस संजू जाधव साहेबांनीही आवाज दिला. त्याला पकडल्यानंतर चार पाच मिनिटाने मला पोलिसांचा फोन आला. त्याला पकडलंय. पण त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही इथे आलो. त्याचं आणि माझं बोलणं झालं. तो म्हणाला पाटील तुम्ही इकडे या. जाधव साहेबांना घेऊन या. आम्ही येईपर्यंत स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं पोलीस पाटील म्हणाले.
हनुमंत सोनवणे, गुनाट पोलिस पाटील 
       आरोपी दत्ता गाडे याने गंभीर गुन्हा केला होता यामुळे गुनाट गावचे नाव व शिरूर तालुक्याचे नाव बदनाम झाले होते. गावातल्या तरुणाने असा घृणास्पद अपराध केला व संपूर्ण गाव पोलिसांनी वेढले गेले होते. यावेळेस गावाच्या मनात संतप्त भावना होत्या. व आरोपीला पकडण्यासाठी गावाने पोलिसांच्या एक पुढे जाऊन आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. व पोलीस खात्याला सर्व काही मदत गावाने करून आपल्या गावावर लागलेला डाग पुसण्याचे काम केले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!