शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांपैकी ४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, १७ पैकी १२ जागा बिनविरोध निवडून आले आहेत तर ४ गटाच्या ५ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकी च्या रिंगणात उभे ठाकले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे व प्रमुख लिपिक दीपक वराळ यांनी दिली आहे.
तर 12 पैकी 11 जागेवर महायुतीचे उमेदवार यांची वर्णी लागली आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, माजी आमदार अशोक पवार यांची पुतणे सचिन पवार, व भाजपाचे नेते सुरेश पलांडे या प्रमुखांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस असल्याने शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके हे स्वतः निवडणूक कार्यालया जवळ उपस्थित होते यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग पाचुंदकर, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे,
राष्ट्रवादीचे नेते स्वप्निल गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गावडे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र काळे,भाजपाचे नेते राजेंद्र जासूद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत दसगुडे, माजी जिल्हापरिषद सदस्य राहुल पाचर्णे राजेंद्र कोरेकर, सुनील जाधव हे प्रमुख नेते उपस्थित होते. अनेक जागा या आमदार कटके यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या शब्दावर बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या या निवडणुकीवर झेंडा वरचढ राहिला आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे
कारेगाव गट सचिन आनंदराव गवारे, न्हावरा गट नामदेव जयवंत गिरमकर, पाबळ गट लहू बाळासाहेब थोरात, रांजणगाव गणपती गट राजेंद्र उत्तम नरवडे, तळेगाव ढमढेरे गट गुलाब बबन सातपुते, शिक्रापूर गट बाळासाहेब माणिकराव टेमगिरे, धामारी गट कानिफनाथ दादाभाऊ भरणे,
अनुचित जाती-जमाती राखीव गट - विवेक उत्तमराव सोनवणे,
महिला प्रतिनिधी - मनीषा सुनील शेलार, सुजाता राजेंद्र नरवडे.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - संभाजी काळुराम भुजबळ
भटक्या विमुक्त जाती - शरद वसंत कालेवार
या बारा जागेवर बिनविरोध निवड झाली आहे.
या चार गटासाठी निवडणुकी जाहीर झाली आहे
तर सोसायटी मतदार संघ अ वर्ग
मांडवगण फराटा गट
बाळासाहेब अर्जुनराव नागवडे, गणेश रमेश साळुंखे या दोघात लढत होणार आहे.
वडगाव रासाई गट
सुरेशचंद्र मारुतराव ढवळे, शरद बापूराव साठे या दोघांमध्ये लढत होणार आहे.
टाकळी हाजी गट
नवनाथ सुभाष ढमढेरे, प्रकाश बळवंत थोरात, प्रमोद बाळासाहेब दंडवते, महेंद्र सुरेश पाचर्णे, संतोष महादेव वर्पे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
वैयक्तिक सभासद मतदारसंघ
नवनाथ सुभाष ढमढेरे, नितीन अर्जुनराव थोरात, सर्जेराव बाबुराव थोरात
ही निवडणूक 9 मार्च रोजी होणार असून त्याच दिवशी मतदान मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी सांगितले.
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अतिशय कष्ट घेतल्या असून यामुळे 11 जागा महायुतीच्या बिनविरोध झाले आहे याचे सर्व श्रेय कार्यकर्ते व मेहनत घेणारे नेत्यांना देतो. तर शिरूर तालुक्यातील मायबाप जनतेने महायुतीवर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवणार असून शिरूर तालुका खरेदी विक्री संघ नावावर उपास आणण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकरी व सर्व घटकातील नागरिकांना याचा फायदा होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आमदार शिरूर.