सरदवाडी ता. शिरूर पुणे अहिल्यानगर महामार्गावर सरदवाडी ते शिरूर प्रवासादरम्याण भारत पेट्रोल पंपासमोर अज्ञात चार चाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहे. तर अपघातानंतर चारचाकी वाहन चालक पळून गेला आहे.
निखील सोहरायसिंग रवानी (वय 19 वर्षों व्यवसाय शिक्षण, मुळ रा. बोराडेमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे. सध्या माटुंगा ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा सोहरायसींग रवानी (वय 39 ) सोहरायसींग पुनवासीसींग रवानी (वय 41, दोन्ही रा. बोराडेमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे) हे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 25 रोजी रात्री साडेअकरा दरम्याण सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे गावच्या हददीत सरदवाडी ते शिरूर प्रवासादरम्याण भारत पेट्रोल पंपासमोर अज्ञात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन स्प्लेंडर दुचाकी क्र. एम. एच. 12 एस. डब्ल्यु. 4375 हिस पाठीमागुन ठोस मारून अपघात करून अपघातात दुचाकीवरील फिर्यादीचा आई शारदा रखानी व वडील सोहरायसींग रखानी यांना गंभीर दुखापतीस व मोटरसायकलच्या नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता पळुन गेला आहे. याबाबत अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार प्रफुल्ल भगत करीत आहे.