चिंचणी ता शिरूर येथील घोड धरणावर पाण्यासाठी शेतकऱ्यांनी लावलेल्या सात मोटारी खोलून अज्ञात चोरट्याने त्याच्या आत मधील 42 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या चारा चोरून नेले आहे.
याबाबत गणेश बाळासो कोळपे (वय 33, रा. गुणाट कोळपेवाडी ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
अज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक 8 फेब्रुवारी 25 रोजी सायंकाळी सहा ते दिनांक 9 फेब्रुवारी 25 रोजी सकाळी आठ दरम्याण चिंचणी ता. शिरूर धरणालगत असलेल्या फिर्यादी यांच्या मालकीच्या तसेच इतर शेतक-यांच्या मालकीच्या 7 इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी मधील तांब्याच्या तारा एकूण किंमत 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरटयानी मोटारी खोलुन चोरून नेल्या आहेत. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांब विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करीत आहे.