मलठण शिंदेवाडी येथे दुचाकीला ट्रॅक्टरची धडक महिलेचा मृत्यू

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
          शिरूर तालुक्यात मलठण शिंदेवाडी येथे रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला मरण पावली आहे 
       याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       मलठण येथे झालेल्या अपघाता बाबत रंगनाथ रावसाहेब बारगळ (वय 42 वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर)यांनी फिर्याद दिली आहे. तर या अपघातात सुवर्णा रंगनाथ बारगळ ( वय 41 वर्षे, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) मरण पावले आहेत. 
       याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मलठाण ता.शिरूर शिंदेवाडी, येथे रांजणगांव ओझर अष्टविनायक हायवे रोडवरील हॉटेल जयमल्हारचे जवळ आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी रंगनाथ बारगळ व त्यांची पत्नी सुवर्णा बारगळ हे दोघे मलठण शिंदेवाडी जवळील रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर त्यांची मोटार सायकल नं. एम एच 16/सी बी/9276 ही वरून मंचर बाजूकडे जात असताना समोरुन भरधाव वेगातील नंबर नसलेल्या ट्रॅक्टरने दुचाकी ला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सुवर्णा बारगळ ही महिला मरण पावली आहे.
 . याबाबत फिर्यादीवरून अज्ञात लाल रंगाचे ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अनिल आगलावे करीत आहे. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!