शिरूर शहराजवळ बोऱ्हाडेमळा आर के हॉटेल जवळ अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात ३० ते ४० वर्षाच्या अज्ञात इसमाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटली नाही.
याबाबत रमेश पांडुरंग चौधरी (रा.सतरा कमानी पूलाजवळ , शिरूर )यांनी फिर्यादी दिली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर व वाहनावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्यापूर्वी पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर आर. के -हॉटेल समोर एक 35 ते 40 वर्षे
इसमास अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू झाला आहे.
तर अपघात ग्रस्त अज्ञात वाहन कुठलीही खबर नदेता निघून गेले आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे
अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.
