शिरूर
( प्रतिनिधी ) पाबळ ता. शिरुर येथील देवराम पिंगळे हे पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्यांच्या एम एच १२ जे जे ८८९१ या दुचाकीहून गावातील पिंपळवाडी ते पाबळ रस्त्याने चाललेले असताना देवराम यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाले, दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जाताना उपचारापूर्वीच देवराम हरिभाऊ पिंगळे वय ८० वर्षे रा. माळतळे पाबळ ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला, याबाबत राहुल दिलीप पिंगळे वय ३९ वर्षे रा. माळतळे पाबळ ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.
सोबत – देवराम पिंगळे यांचा फोटो.
