विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावेकान्हूर मेसाईमध्ये आयएएस विजयकुमार मगर यांचे प्रतिपादन

9 Star News
0
विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे
कान्हूर मेसाईमध्ये आयएएस विजयकुमार मगर यांचे प्रतिपादन
शिरूर 
( प्रतिनिधी ) दहावी व बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील महत्वाचे दिवस या काळात विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करत भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे प्रतिपादन आयएएस अधिकारी पोलीस प्रशिक्षण विद्यालय लातूरचे प्राचार्य विजयकुमार मगर यांनी केले आहे.
                       कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विकास मंडळाच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ दरम्यान मार्गदर्शन करताना आयएएस अधिकारी पोलीस प्रशिक्षण विद्यालय लातूरचे प्राचार्य विजयकुमार मगर बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती आनंदराव तांबे होते, तर याप्रसंगी विक्रीकर विभागाचे सहआयुक्त नरेंद्र कासार, याप्रसंगी विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा अंजली घोलप, सचिव सदाशिव पुंडे, खजिनदार पोपट तळोले. प्राचार्य श्री. विनोद शिंदे, संचालक विलास पुंडे, रमेश खर्डे, अनिल चौधरी, बबन शिंदे, भास्कर पुंडे, विठ्ठलराव खर्डे, वसंत वाळुंज, मंगेश घोलप, सुधीर पुंडे , दिपक तळोले यांसह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आयएएस विजयकुमार मगर व विक्रीकर सहआयुक्त नरेंद्र कासार यांनी ग्रामीण भागातील शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले, तर प्रसिद्ध उद्योगपती आनंदराव तांबे यांनी प्रतिकूल परिस्थितीशैक्षणिक प्रगती करणाऱ्या संस्था व गुरुजनांचे कौतुक करत शाळेची आर्थिक परिस्थिती जाणून घेत शाळेला पंचवीस हजार रुपयांची देणगी देत सर्वांना सुखद धक्का दिला. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक मनोज धुमाळ, बशीर मुलानी, अविनाश दौंडकर, दिपक मोरे, कविता रेटवडे, दगडू दंडवते, धंनजय तळोले, रोहिणी पुंडे, तुषार जाधव यांनी केले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझीमच्या गजरात पुष्पवृष्टी करुन मान्यवरांचे स्वागत केले, त्यांनतर देशभक्तीपर तसेच आम्ही शिवकन्या या स्वागतगीताचे सादरीकरण केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य विनोद शिंदे तर संतोष घोलप यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – कान्हुर मेसाई ता. शिरुर येथे निरोपसमारंभ दरम्यान शाळेला मदतीचा हात देताना उद्योगपती आनंदराव तांबे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!