शिरूर
( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील आनंदनगर येथून भाजी विक्रेते विनोद वाघे यांच्या दुकानासमोरील रोहिदास गाडेकर यांच्या खोलीमध्ये राहणाऱ्या गुरुदास पाटील या भाडेकरु ने विनोद यांची उधारी देण्यासाठी गावावून पैसे आणि पत्नी व मुलांना आणतो असे म्हणत विनोद यांची के ए ०१ जे पी ६२८१ हि दुचाकी घेउन गावाला गेला त्यांनतर गुरुदास पुन्हा आलाच नाही दरम्यान खोलीमालक रोहिदास गाडेकर यांनी गुरुदास परस्पर खोली खाली करुन फरार झाल्याचे सांगितल्याने विनोद रघुनाथ वाघे वय ३३ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुरुदास पाटील याच्या विरुद्ध गुन्हा करत तपास केला असता सदर आरोपी नाशिक मध्ये असल्याचे समोर आल्याने पोलीस हवालदार रविकिरण जाधव व राहुल वाघमोडे यांनी थेट नाशिक गाठत गुरुदास राजेंद्र पाटील रा. त्रिमूर्ती चौक नाशिक जि. नाशिक याला ताब्यात घेत त्याच्या जवळील दुचाकी देखील जप्त केली असून पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.