दहिवडी ता. शिरुर येथील तुकाराम पिंगळे व ज्ञानेश्वर पिंगळे हे बापलेक शेतातून येत असताना शेजारील भैरू पिंगळे हा त्या बापलेकांना शेतातील रस्त्याने जायचे नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्य्यांनी मारहाण करत होता, यावेळी ज्ञानेश्वर यांचा अपंग असलेला ओम हा मुलगा त्याच्या व्हील चेअरवर बसून सदर घटना स्थळी येत तुम्ही माझ्या वडील व आजोबांना शिव्या देऊ नका अशी विनवणी भैरू यांना करत असताना भैरू यांनी अपंग ओमला देखील शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या व्हील चेअरला लाथ मारून ओमला खाली पाडले, याबाबत ओम ज्ञानेश्वर पिंगळे वय १७ वर्षे रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे या अल्पवयीन युवकाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भैरू शिवाजी पिंगळे रा. रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.
दहिवडीत दोघा इसमांसह अपंग युवकाला मारहाण
फेब्रुवारी ०९, २०२५
0
दहिवडीत दोघा इसमांसह अपंग युवकाला मारहाण
Tags