शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ जागांसाठी ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती शिरूर सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारीअरुण साकोरे यांनी दिली आहे.
रांजणगाव गटातून राजेंद्र नरवडे यांचे एकाचेत चार उमेदवारी अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे.
अडीच वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित असणारी ही निवडणूक लागल्याने विधानसभा निवडणूक नंतर सहकार खात्याच्या ह्या पहिल्या निवडणुकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. अद्याप महाविकास आघाडी किंवा माहिती यांच्याकडून या निवडणुकीसाठी रणसिंग फुंकले नसले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीवर पॅनलचा शिक्कामोर्तब होईल.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज ११ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता.
त्यामुळे आज सकाळपासूनच शिरूर तहसील कार्यालय आवारामध्ये उमेदवार प्रतिनिधी यांनी मोठी गर्दी केली होती.
उद्या दिनांक १२ फेब्रुवारी २५ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी शिरूर सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक १३ फेब्रुवारी २५ ते २७ फेब्रुवारी २५ असा असून, २८ फेब्रुवारी २५ रोजी चिन्ह वाटप, सर ९ मार्च २५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर मतमोजणी ज्या ठिकाणी मतदान होणार त्याच ठिकाणीं ९ मार्च रोजी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने होणारा असून त्याच दिवशी निकालही घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी सांगितले.
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी विविध गटातून असलेल्या जागा व आलेले उमेदवार अर्ज पुढील प्रमाणे
सोसायटी मतदार संघ अ वर्ग
कारेगांव गट १ जागा -२ उमेदवारी अर्ज ,
मांडवगण फराटा गट १ जागा -५ उमेदवारी अर्ज ,
वडगांव रासाई गट १ जागा- ६ उमेदवारी अर्ज ,
न्हावरा गट १जागा - ५ उमेदवारी अर्ज ,
पाबळ गट १ जागा - ६ उमेदवारी अर्ज ,
रांजणगांव गणपती गट १ जागा -४ उमेदवारी अर्ज,
तळेगांव ढमढेरे गट १ जागा - ९ उमेदवारी अर्ज,
टाकळाहाजी गट १ जागा - ८ उमेदवारी अर्ज,
शिक्रापुर गट १ जागा - ५ उमेदवारी अर्ज,
धामारी गट १ जागा - ५ उमेदवारी अर्ज
वैयक्तीक सभासद मतदार संघ ब वर्ग २ जागा -१८ उमेदवारी अर्ज,
अनुचित जाती / जमाती (राखीव) १ जागा -५, उमेदवारी अर्ज,
महिला प्रतिनिधी २ जागा - १५ उमेदवारी अर्ज,
इतर मागासवगीय प्रतिनिधी (राखीव)१ जागा - ५ उमेदवारी अर्ज,
भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास प्रवर्ग (राखीव) १ जागा - ५ उमेदवारी अर्ज,
अशा एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.