शिरूर बाह्यमार्गावर दि नाना स्पॉट धाब्या जवळ कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार पाचशे रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १ फेब्रुवारी २५ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना या पथक्याला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक गुंजाळ हा कमरेला पिस्तूल लावून शिरूर बाह्य महामार्गावर बंद असलेले दी नाना स्पॉट धाब्याजवळ उभा आहे. अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक यांनी दी नाना स्पॉट धाब्यावर सापळा रचून आरोपीला पकडले त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण ४० ह्जार ५०० रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, प अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली व्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर माळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.