शिरुर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या गाडीवरच्या विश्वासातील वाहन चालकाने गाडीतील सोन्याचे दागीने चोरुन नेले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, प्रकरणी त्या वाहनचालकास रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी अटक केली आहे .
नितीन मुरलीधर मिटकरी (सध्या रा. चंदननगर पुणे मूळ रा. जुना कराडनाका पंढरपूर जि. सोलापूर) याला अटक केली आहे.
याबाबत मानसिंग नानाभाऊ पाचुंदकर (वय ४२ वर्षे रा. रांजणगाव गणपती भांबर्डे रोड ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
या बाबत पोलीसांनी दिलेली माहीती पुढीलप्रमाणे
दागिने चोरी प्रकरणातील आरोपी
नितीन मुरलीधर मिटकरी राहणार चंदन नगर पुणे यास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी
अटक करून शिरूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती व शिरूर -आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या एका वाहनावर नितीन मिटकरी चालक होता पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती या काही कामाच्या निमित्ताने त्यांच्या कारमधून गेलेल्या असताना त्यांनी त्याचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवून पर्स कार मध्ये ठेवली, त्यावेळी चालक कारमध्येच होता, काम आटोपून ज्योती पाचुंदकर पुन्हा कारमध्ये बसून घरी आल्यानंतर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले नसल्याने चालकाने दागिने चोरी केल्याबाबतचा अंदाज पाचुंदकर यांनी वर्तविला आणि याबाबत मानसिंग नानाभाऊ पाचुंदकर (वय ४२ वर्षे रा. रांजणगाव गणपती भांबर्डे रोड ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी नितीन मुरलीधर मिटकरी (सध्या रा. चंदननगर पुणे मूळ रा. जुना कराडनाका पंढरपूर जि. सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने केला असून त्यास अटक करून २९ जानेवारी अटक केली असून ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याचे
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले