अनैतिक संबंधातून शिक्रापूर ता.शिरूर वाडागावातून तीन बालकांचे अपहरण; बालिकेचा विहिरीत फेकून खून

9 Star News
0
अनैतिक संबंधातून शिक्रापूर ता.शिरूर वाडागावातून तीन बालकांचे अपहरण; बालिकेचा विहिरीत फेकून खून
शिरूर प्रतिनिधी 
       वाडागाव (ता. शिरुर) येथील तीन लहान बालकांचे एका युवकाने अपहरण करुन एका बालिकेचा खून करुन मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या प्रकरणाने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे. 
         गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव असून तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
       दरम्यान पोलिसांनी बबन रामपीर यादव (वय ४२ रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे.

वाडागाव यथील गायत्री, कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय तीन वर्षे) हे तिघे बालके शनिवारी (दि.२२) बेपत्ता झाले. याबाबत विनादेवी रणजीतकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पो. नि. दिपर तन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. अविनाश शिळीमकर, पो. उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहाय्यक उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पो. हवा. आत्माराम तळोले, रोहिदास पारखे, नवनाथ नाईकडे, किशोर तेलंग, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल दांडगे, औदुंबर वाघमारे, ललित चक्रनारायण आदींनी बालकांचा शोध सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे समोर आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात थेट खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव गाठले. त्यांनतर सदर ठिकाणहून बहुल गावातून बबन हा तिघांपैकी दोघा बालकांना पुन्हा शिक्रापूर दिशेने येताना दिसले. त्यांनतर काही वेळात दोन बालके पोलिसांना रस्त्यावर मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत बबनचा शोध घेतला असता रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बबन यादव याला ताब्यात घेतले असता बहुळ गावातील एका विहिरीमध्ये गायत्रीला टाकून दिल्याचे सांगितले.

त्यांनतर शिक्रापूर, शिरुर, रांजणगाव पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सदर ठिकाणी शोध घेतला. दरम्यान पुणे महानगर प्रादेशिक परिवहन विभागाचे अग्निशमन अधिकारी प्रकाश मदने, महेश पाटील, प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, अल्ताफ पटेल, आपदा मित्र वैभव निकाळजे, राहुल काटे, राज जावळे, प्रेम निकाळजे, रोहित शिंदे, निखिल काळे, राहुल गायकवाड, यश शिंदे, राहुल पवळे आदींनी सदर विहिरीमध्ये शोध घेतला असता गायत्रीचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करत आहेत.
     अनैतिक संबंधांना विरोध म्हणून अपहरण ?
वाडागाव येथून अपहरण झालेली तिनही बालकांचे कुटुंबीय व आरोपी हे परप्रांतिय असून मृत गायत्रीच्या मावशी बरोबर आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तिनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहीरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!