शिरूर येथील श्री रामलिंग देवस्थान यात्रा निमित्त पोलिसांची वाहतुक व पार्किंग नियमावली -संदेश केंजळे पोलिस निरीक्षक

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
      श्री रामलिंग यात्रा व पालखी निमित्त शिरूर,शहर व रामलिंग जुने शिरूर येथील वाहतुकीत अंशतः बदल करण्यात आला असून नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले असून याबाबत 25 फेब्रुवारी व 26 फेब्रुवारी रोजी या नियमाचे कडक पालन करावे असेही सांगण्यात आले आहे.
         शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत रामलिंग ता. शिरूर जि. पुणे येथे श्री रामलिंग देवस्थान यात्रा असल्याने 
 दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ व दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबादप्रमाणे प्रभु रामलिंग देवस्थानची महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त उदया दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शिवसेवा मंदिर येथुन पालखी मिरवणुक सुरू होणार असुन त्याकरीता मिरवणुक मार्गावरील वाहतुकी मध्ये अंशत बदल करण्यात आलेला असुन, त्यामध्ये आहिल्यानगर येथुन येणारी वाहतुक बी जे कॉर्नर ,निर्माण पलाझा, सरकारी हॉस्पिटल मार्गे एस टी स्टैंड अशी जाईल. तसेच पुणे मार्गावरून येणारी वाहतुक ही एस टी स्टॅड, मार्केट यार्ड, सरकारी हॉस्पिटल, निर्मान प्लाझा अशी वळवण्यात आलेली आहे.
         तर दिनांक २६ फेब्रुवारी २५ रोजी  रामलिंग ता. शिरूर जि. पुणे येथे वाहतुकीमध्ये मलठन मार्ग शिरूर ला येणारी वाहतुक ही सरदवाडी मार्गे शिरूर ला येईल व शिरूर वरून जाणारी वाहतुक ही सरदवाडी मार्गे मलठन अशी वळवण्यात आलेली आहे.

    आज २५ फेब्रुवारी रोजी शिरूर शहरामधील सर्व व्यापारी वर्ग यांना आवाहन करण्यात येते की पालखी मिरवणुक मार्गावरील आपले दुकाना समोर लागणारी वाहने लावु देवु नये तसेच लावलेली वाहने ही आपण काढुन घ्यावेत. जेणेकरून पालखी मिरवणुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्मान होणार नाही. याकरीता सर्वांनी सहकार्य करावे.
          रामलिंग यात्रेनिमित्त वाहतुक कोंडी टाळण्याकरीता तीन मोठे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे त्यामध्ये

१) शिरूर शहरामधुन जाणारे भाविक हे दसगुडे पार्कीन १ येथे वाहने पार्क करून एस टी बसने रामलिंग मंदिर दर्शनासाठी जातील.

२) दुव्हीलर, फोर व्हिलर वाहन व एस टी बस करीता बैलगाडा घाट येथे पार्कीग २ करण्यात आलेले आहे.

३) सरदवाडी व मलठन येथुन येणारे भाविकांकरीता रामलिंग मंदिरासमोरील ग्रांउड मध्ये पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे.

सदर रामलिंग यात्रेनिमित्त शिरूर पोलीस स्टेशन कडुन १० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदार, २ पोलीस स्ट्रटींग, ५० स्वंयसेवक, १० होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!