शिरूर l (प्रतिनिधी )
हरहर महादेव..रामलिंग महाराज की जय च्या जयघोषlत ...तर हरी नामाचा जयघोष ... देवाचा अश्व ..ढोल ताशा, डफडे च्या दणक्यात ...तर सुमधुर ब्रासबॅड च्या संगीतात...
झांज पथकाच्या दणक्यात ....तर महाआरती सनई चौघडा च्या साक्षीने आज शिरूर शहरात शिरूर चे जागरूक देवस्थान प्रभू श्री रामलिंग महाराज पालखीस मोठ्या उत्साहात सुरवात झाली .व तीन दिवस चालणाऱ्या रामलिंग यात्रेला आज पासून सुरवात झाली .
शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशीवरात्री च्या दिवशी जुने शिरूर येथील मंदिरात यात्रा भरवली जाते त्या अगोदर च्या दिवशी या यात्रेची पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशिला असतो .शिरूर शहरांतील शिवसेवा मंदिरात रामलिंग देवस्थान ट्रस्ट उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल ,शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार , नेते राहुल पाचर्णे,रामलिंग देवस्थान ट्रस्ट विश्वस्त ,यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली .प्रथेप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत मुख्याधिकारी प्रीतम पाटील,यांनी पालखीस पुष्पहार घालून केले यावेळी रामलिंग देवस्थान यांच्या वतीने मानाचा फेटा मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना तर यांना बांधण्यात आला यावेळी देवस्थान विश्वस्त अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल , आमदार ज्ञानेश्ववर कटके, माजी आमदार अशोक पवार यांना नगरपरिषद यांचे वतीने फेटा बांधण्यात आला व मुख्य पालखी सोहळ्यास सुरवात झाली यावेळी युवा उद्योगपती आदित्य धारिवाल, विश्वस्त पोपट दसगुडे, तुळशीराम परदेशी,
,रामलिंग देवस्थान चे विश्वस्त गोदाजी घावटे ,वाल्मीकराव कुरुंदळे,रावसाहेब घावटे , बलदेवसिंग परदेशी , खजिनदार पोपटराव दसगुडे , विश्वस्त जगन्नाथ पाचर्णे , नामदेव घावटे शिवसेवा मंडळ ट्रस्ट चे सचिव मनसुख गुगळे, बबनराव कर्डिले , श्री निवास परदेशी ,दादापाटिल घावटे, माजी सरपंच अरुण घावटे , नामदेव जाधव ,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माऊली घावटे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक संजय देशमुख मुजफ्फर कुरेशी ,सचिन धाडीवाल, प्रवीण दसगुडे,विठ्ठल पवार, शरद कालेवार,शिरूर शहर पंचक्रोशी रामलिंग भक्त, महिला पुरुष अबाल वृद्धांनी पालखीच्या दर्शनाला मोठी गर्दी केली होती..आजच्या या पालखी सोहळ्या करिता संपूर्ण शिरूर शहर भगव्या पताका ,भगवे झेंडे ,प्रत्येक ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या ,तर पालखी मिरवणुक मधे भगवे फेटे बांधण्यात आले होते .
शिरूर ढोल पथक ,युवा ढोल पथक ,चाळीसगाव येथील ब्रास बॅड , अमर ब्रास बॅड , जालना, नागपूर येथील ब्रास बँड,तर आळंदी येथील भजनी मंडळ तर पालखी समोर असलेले भालदार चोपदार ,तुलसी घेतेलेले महिला, करडे येथील विठ्ठल जगदाळे यांचा नाचणारा अश्व हे आजच्या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले तर शहरातील खिदमत फाउंडेशन, कापड बाजार ,अखिल रामआळी ,दधिचे चौक ,मारुती आळी ,आझाद सोशल क्लब ,सरदार पेठ ,हलवाई चौक ,सुभाष चौक ,सोनार आळी ,कुंभारआळी ,अजिंक्य तारा मित्र मंडळ ,मुम्बई बाजार ,डबेनाल मित्र मंडळ यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक देखावे व भाविकांचे करिता नाश्ता, कुल्फी, वडे ,शरबत ,चहा यांची सोय केली होती तर . शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने १० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदार, २ पोलीस स्ट्रटींग, ५० स्वंयसेवक, १० होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
आज पहाटे पालखीचे रामलिंग जुने शिरूर येथील मंदिराकडे प्रस्थान होईल तेथे उद्योगपती प्रकाशभाऊ धरिवाल , युवा उद्योजक आदित्य धारिवाल श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते महाअभिषेक होऊन मुख्य यात्रेस सुरवात होणार आहे .