शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे ११ गुन्हे उघडीस आणून चोरीच्या ११ मोटर सायकल किंमत ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम )या सराईत आरोपीला अटक केली आहे. त्याला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी बजावली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनच्या स्थानिक तपास पथकाने ही धडाकेबाज कारवाई केल्याने पोलिसांचे शिरूर शहर व परिसरातून कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक शिरूर शहर व पोलीस हद्दीतील मोटर सायकल चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलींचा शोध घेत असतानाच पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे सराईत संतोष उर्फ शरद इंगोले याचा मोटर सायकल चोरीमध्ये सहभाग असल्याची महिती मिळाली या माहितीची खात्री करून आरोपी असलेल्या मालेगाव, जि. वाशिम परीसरात शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता आरोपीने शिरूर पोलीस स्टेशन १, घाड पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा १, चाकण पोलीस स्टेशन १. भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन १, लोणीकंद पोलीस स्टेशन १, खडकी पोलीस स्टेशन १, आळंदी पोलीस स्टेशन २. महाळुंगे पोलीस स्टेशन १, दिषी पोलीस स्टेशन व इतर एक असे एकुण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, चोरितील ११ दुचाकी एकुण ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन आरोपीविरोधात जळुका , जि.वाशिम, मालेगाव जि.वाशिम, पातुर जि.अकोला, जामनेर जि. जळगाव, लोणार जि. बुलढाणा, मेहकर जि. बुलढाणा येथील पोलिस स्टेशन येथे दुचाकी चोरी संदर्भातील एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विशाल कोथळकर करीत आहे.