शिक्रापूर ता. शिरुर हॉटेल निखील समोरून चाललेल्या महिलेला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काकू थांबा असे म्हणत आम्ही पोलिस आहोत असे सांगून या भागात महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून नेत आहे असे सांगून हात चलाखीने महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनि चोरून नेले आहे.
तीन दिवसापूर्वी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गोलेगाव येथे ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याचे सांगून अशा प्रकारे त्याचे साडेतीन लाख रुपये चे दागिने मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे ही टोळी शिरूर शिक्रापूर रांजणगाव परिसरात कार्यरत आहे. याचा शोध पोलिसांनी लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत प्रतिभा सतीशन पनिकर वय ५० वर्षे रा. त्रिमूर्ती नगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील प्रतिभा पनिकर या हॉटेल निखील समोरून चाललेल्या असताना हॉटेल समोर दोन इसम दुचाकीसह थांबलेले होते, त्यावेळी त्यांनी प्रतिभा यांना आवाज देत काकू आम्ही पोलीस असल्याचे सांगत गावामध्ये चोऱ्या होते आहे, महिलांचे गळ्यातील दागिने कापून नेत आहेत असे सांगत प्रतिभा पनिकर यांच्या गळ्यातील दागिने पेपरमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवण्यास सांगून हातचलाखी करत प्रतिभा यांचे गळ्यातील अडीच तोळे वजनाचे दागिने हातचलाखीने काढून घेत त्यांच्या दुचाकीहून पोबारा केला, याबाबत प्रतिभा सतीशन पनिकर वय ५० वर्षे रा. त्रिमूर्ती नगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिरुर नंतर शिक्रापूर मधील घटनेने तालुक्यात खळबळ . . . . .
शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथे दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठाला पोलीस असल्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना ताजी असताना लगेचच शिक्रापूर येथे अशीच घटना घडली असल्याने दोन्ही घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.