अण्णापूर येथे त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून मारहाण

9 Star News
0
अण्णापूर येथे त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून मारहाण
शिरूर 
( प्रतिनिधी ) अण्णापूर ता. शिरुर येथे त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडून लाथा बुक्क्या व गजाने बेदम मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 4, 24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव (रा. अण्णपूर, ता. शिरूर, ज. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत वसंत मल्हारी जाधव (वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
                        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे अन्नापूर ता. शिरुर येथील वसंत जाधव हे घरात असताना रात्रीच्या वेळी त्यांचा पुतण्या रामदास उर्फ मुसाभाई हा दरवाजाला लाथ मारून घरात आला त्यावेळी वसंत यांनी तू रात्रीचा घरात का आला असे म्हणत म्हणाले असता हे घर माझ्या नावावर करुन दे असे रामदास म्हणाला, त्यावेळी वसंत यांनी नकार दिला असता रामदास याने वसंत यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली, यावेळी शेजारील भाऊ गिरे यांनी वसंत यांना मारहाणीतून सोडवले, याबाबत वसंत मल्हारी जाधव वय ७३ वर्षे रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास उर्फ मुसाभाई सिताराम जाधव रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!