पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड गावठाण नजीक मोठे भगदाड... सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

9 Star News
0
पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड गावठाण नजीक मोठे भगदाड

शिरूर,प्रतिनीधी
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण नजीक मोठे भगदाड पडल्याने मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात भरावा करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरच्या ओढ्यालगत असणाऱ्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता .याबाबत अनेकदा मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक शालेय विद्यार्थी रस्त्याने ये-जा करत असून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक देखील या मार्गाने होत आहे. मात्र पंधरा दिवसांपासून पडलेल्या या खड्डयाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून हा खड्डा जणू अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत विभागाकडून सदरचा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

[पिंपरखेड – वडनेर खुर्द रस्ता हा इतर जिल्हा मार्गात समाविष्टकरण्यात आला असून याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना सूचना देऊन रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवून घेण्यात येईल. ]

-नवनाथ शेळके , अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरुर

[सदर रस्ता हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रस्त्यावर पडलेले भगदाडजांबूत वार्ताहर , दि. ०६- दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण नजीक मोठे भगदाड पडल्याने मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात भरावा करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरच्या ओढ्यालगत असणाऱ्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता .याबाबत अनेकदा मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक शालेय विद्यार्थी रस्त्याने ये-जा करत असून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक देखील या मार्गाने होत आहे. मात्र पंधरा दिवसांपासून पडलेल्या या खड्डयाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून हा खड्डा जणू अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत विभागाकडून सदरचा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

[पिंपरखेड – वडनेर खुर्द रस्ता हा इतर जिल्हा मार्गात समाविष्टकरण्यात आला असून याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना सूचना देऊन रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवून घेण्यात येईल. ]
-नवनाथ शेळके , अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरुर

[सदर रस्ता हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवावे अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामस्थांचे वतीने माजी मंत्री वळसे पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.]

-किरण ढोमे , अध्यक्ष , विविध विकास कार्यकारी सोसायटी, पिंपरखेड 

 तातडीने बुजवावे अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामस्थांचे वतीने माजी मंत्री वळसे पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.]
-किरण ढोमे , अध्यक्ष , विविध विकास कार्यकारी सोसायटी, पिंपरखेड

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!