दुचाकी जळून खाक / सुदैवाने कोणतीही हाणी नाही
( प्रतिनिधी ) वाजेवाडी ता. शिरुर येथील वढू बुद्रुक रस्त्याने चाललेल्या धावत्या दुचाकीने अचानकपणे पेट घेतल्याने दुचाकी जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.
वाजेवाडी ता. शिरुर येथील वढू बुद्रुक रस्त्याने सागर गुंजाळ हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ झे झेड ८१३४ या दुचाकीहून वढू बुद्रुक बाजूने चौफुला येथे येत असताना अचानकपणे दुचाकीच्या इंजिन मधून धूर येऊन दुचाकीने पेट घेतला, दरम्यान सागर गुंजाळ बाजूला झाले असताना माजी तंटामुक्ती अध्यक्ष कचरू वाजे, वाल्मिक वाजे, आप्पासाहेब वाजे, अनिल वाजे, रवींद्र वाजे, सुनील वाजे यांनी माती व पाण्याच्या सहाय्याने आग विझवली मात्र सदर आगीमध्ये दुचाकी जाळून खाक झाल्याने दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले असून नशीब बलत्तर म्हणून सागर गुंजाळ थोडक्यात बचावले आहे.
फोटो खालील ओळ – वाजेवाडी ता. शिरुर येथे धावत्या दुचाकीने पेट घेऊन खाक झालेली दुचाकी.