वाघनखे नाटक... व्याख्यान...महाराष्ट्राचा शाहिरी कार्यक्रम... आणि भव्य शिवशाही मिरवणूक.... फटाक्यांची आतषबाजी... भगव्या झेंड्याची हवेत फिरली शान... डीजेचा दणका
आणि शिरूर शहर झालं शिवमय शिवशाही मिरवणुकीने शिरूरकराची मने जिंकत जय भवानी जय शिवराय.... छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणे संपूर्ण शिरूर शहर दणाणून गेले होते.
शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यात येते. आजही तेवढ्यात उत्साह शिवजयंती साजरी करण्यात आली. परंतु सध्या शिवजयंती चा इतिहास आणि वाढती शिवजयंती आणि नागरिकांचे मन जिंकणाऱ्या मिरवणुकी प्रत्येक वर्षी नवीन आकर्षण ठरत आहे.
शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल खांडगे सर यांचे आजचा युवा उद्याचे भविष्य या विषयावरील व्याख्यान शिरूरकरांची मने जिंकून गेले. तर १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे वाघ नखे हे २५ कलाकारांनी सादर केलेले नाटक प्रत्येक शिरूरकरांच्या मनात घर करून गेले. तर 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा शाहीरी बाणा हे प्रसिद्ध युवाशाहीर चंद्रकांत माने व युवा शाहीर ऋतुजा माने यांनी शिरूरकरांची वाहवा मिळवत जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत उत्साह वाढवला.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजंमगुंडे उपस्थित होते.
शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून या छत्रपती शिवाजी महाराज जयंती ची शिवशाही मिरवणुकीत सुरुवात झाली. लहानांपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकाने एकच ठेका आणि अनेकांच्या हातात भगवे ध्वज नाचत संपूर्ण शिरूर शहरातून ही मिरवणूक निघाली शहरातील व पंचक्रोशीतील महिला पुरुष लहान बाळांपासून सर्वांनीच या शिवजयंतीचा आनंद घेतला. तर अनेक पालक आपली लहानगी मुलं घेऊन शिवजयंती मिरवणुकीमध्ये मुलांना शिवरायांचा इतिहास शिकवताना व जय भवानी जय शिवराय घोषणा देताना दिसत होते. 
शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती समितीच्या कुणाल काळे ,अक्षय ढमढेरे, सुनील इंदुलकर ,सागर परभणे , भूषण थोरात , भूषण खैरे , योगेश फाळके , विकास सांबारे , पराग खराडे , ऋषिकेश गुजर , मोहीत माने,रामराज गवारे, योगेश जामदार, हेमंत नेपाळी,अजिक्य महाजन , भूषण रणदिवे या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून शिवजयंती यशस्वी पार पाडली आहे.