बोऱ्हाडे मळा शिरूर येथे क्रांती तरुण मंडळ ट्रस्ट वतीने सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडे शिवगीते.. शिव व्याख्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.चिमुकली सृष्टीराणी वर्पे यांचे शिवजयंती निमित्त व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली.
मंडळाचे ट्रस्टी आप्पासाहेब वर्पे यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार घालून आणि ज्योत प्रज्वलित करून शिवगर्जनांच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक व कलागुणांचे कार्यक्रम पोवाडे, शिवगीते, शिवकालीन प्रसंग, वेशभूषा, साहसी खेळ असे एक न अनेक कार्यक्रम झाले.
सर्व सहभागी स्पर्धकांना मंडळाचे वतीने प्रशस्तीपत्रक वाटप केले.
कार्यक्रमास मंडळाचे ट्रस्टी शामकांत वर्पे, सभासद गणेश किसन वर्पे, संतोष बोऱ्हाडे, गणेश रमेश बोऱ्हाडे, उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे नियोजन व आयोजन या सचिव चेतन बोऱ्हाडे, उपसचिव प्रदीप वर्पे, खजिनदार राहुल वर्पे, कार्याध्यक्ष आदित्य बोऱ्हाडे, विशाल वर्पे , आदेश वर्पे, अक्षय वर्पे,अक्षय बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, अजित सूर्यवंशी, केतन बोऱ्हाडे आणि अध्यक्ष अमित वर्पे( अध्यक्ष) यांनी केले.