जातेगाव बुद्रुक येथील श्रेयस होळकर शिरूर मल्लसम्राट तर महिलांमध्ये केंदूरच्या सिध्दी शिंदेने मिळवला किताब

9 Star News
0
जातेगाव बुद्रुक येथील श्रेयस होळकर शिरूर मल्लसम्राट तर महिलांमध्ये केंदूरच्या सिध्दी शिंदेने मिळवला किताब 
शिरूर प्रतिनिधी 
         केंदूर ता. शिरूर येथे २२ व्या शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेत जातेगाव बुद्रुक येथील श्रेयस होळकर याने, तर महिलांमध्ये केंदूरच्या सिध्दी शिंदे हिने किताब मिळवला. दोन्ही विजेत्यांना बुलेट आणि स्प्लेंडर दुचाकीसह मोठ्या रोख रकमेच्या बक्षिस तर चांदीच्या दोन्ही गदा युवा कात्रज संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, उद्योगपती यशराज शिवले व स्पर्धेचे यजमान केंदूरचे सरपंच प्रमोद पर्हड यांच्या हस्ते देण्यात आल्या. 
      ही स्पर्धा ३ दिवस सुरू होती. शिरूर तालुका कुस्ती संघाचे संस्थापक रामभाऊ सासवडे, प्रा. झेंडू पवार, अप्पासाहेब धुमाळ, कानिफ गव्हाणे, केंदूरचे उपसरपंच शालन भोसुरे, माजी उपसरपंच भरत साकोरे, संतोष साकोरे व ग्रामस्थांच्या पुढाकाराने नुकतीच ही स्पर्धा पार पडली. 
स्पर्धेत २१० पहिलवान सहभागी झाले होते.
शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीत २५ कुस्त्या झाल्या, त्यानंतर महिलांमध्ये अंतिम सामना प्रतिक्षा ढमढेरे (तळेगाव) व सिध्दी शिंदे (केंदूर) या दोघींत झाला. यामध्ये सिध्दीने पहिल्या फेरीपासून एकहाती पकड घेत विजेती झाली. पुरुष गटात जातेगाव बुद्रुकचा श्रेयस होळकर व अण्णापूरचा किरण पवार यांच्यात लक्षवेधी लढत झाली. यात श्रेयसने बाजी मारली.
या कार्यक्रमात माजी सभापती अरविंददादा ढमढेरे यांना स्व. बाबूराव पाचर्णे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीपअप्पा भोंडवे, मेघराज कटके यांनी मार्गदर्शन केले, तर पंच म्हणून मारुती सातव, प्रदीप बोत्रे, सागर मारकड, कुलदीप यादव, काळूराम लोखंडे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघना
बोर्डीकर-साकोरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार माऊली कटके, स्वप्निल ढमढेरे, देवदत्त निकम, प्रकाश पवार, उद्योगपती प्रफुल्ल शिवले, राहुल पाचर्णे, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, सविता पऱ्हाड, मानसिंग पाचुंदकर, शेखर पाचुंदकर, रवींद्र काळे, स्वप्निल गायकवाड, अंकुश शिवले, माऊली भंडारे, गजानन साकोरे उपस्थित होते.वजन किलोगटासह पुरुष, महिला विभागातील विजेते, उपविजेते पुढीलप्रमाणे : बुद्रुक), उपविजेता : कार्तिक जाधव (न्हावरा), (धुमाळवाडी), 'उपविजेता : सार्थक कोळपे (मांडवगण फराटा), ३८ किलो : विजेता : रणवीर गव्हाणे (डिंग्रजवाडी), उपविजेता : प्रथमेश गायकवाड (मलठण), ४५ किलो : विजेता : दिगंबर थोरात (वाघाळे), उपविजेता : संदेश खाडे (म्हसे बुद्रुक), ५२ किलो : विजेता : अजय फुलफगर (आंबळे), उपविजेता : मयुर जाधव (न्हावरा), ५७ किलो : विजेता : किरण
काहे (रामलिंग), उपविजेता : गणेश थोरात (मलठण), ६२ किलो : विजेता : अमित कुलाल (अरणगाव), उपविजेता : आदित्य जगताप (चिंचणी), ६८किलो : विजेता : प्रशांत रुपनर (कान्हूर मेसाई), उपविजेता : प्रेम गव्हाणे (न्हावरा). पवार (शिरूर), ७९ किलो : विजेता : ओम साकोरे (केंदूर), उपविजेता : गणेश चोरे (डोंगरगण), ७९ ते १२५ किलो (खुले) : विजेता : श्रेयस होळकर (जातेगाव बुद्रुक), उपविजेता : किरण पवार (अण्णापूर).
महिला विभाग : ४० किलो : विजेती : अक्षरा माहुलकर (टाकळी भीमा), उपविजेती : अंजली इंगळे (निमगाव म्हाळुंगी). ४८ किलो : विजेती : ज्ञानेश्वरी खैरे (शिक्रापूर), उपविजेती : शिवानी गावडे (पिंपळे-खालसा). 55 किलो: विजेती: मीनल धुम्मल (पिंपळे-खालसा), उपविजेता: सायली धुम्मल (पिंपळे-खालसा), 55 किलो ते पुढे (खुले): विजेती: सिद्धी शिंदे (केंदूर), उपविजेता: प्रतीक्षा ढमढेरे (तळेगाव धामढेरे). (धनंजय गावडे )

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!