शिरूर शहरातील शिरूर गोलेगाव रस्त्यावरील सुंदर सृष्टी समोरील मारवाडी एम्पायर सोसायटी येथील नवीन इमारतीवरून उडी मारून १६ वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत आत्महत्याचे कारण समजू शकले नाही .
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मयताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरी ओम गजानन बाळे (वय 16 वर्ष,रा. श्री ओम साई नगर गोलेगाव रोड शिरूर), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत गजानन भिमराव बाळे (रा.श्री ओम साई नगर गोलेगाव रोड शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी गजानन बाळे यांचा मुलगा हरिओम हा घरी आई-वडिलांना मी फिरून येतो असे म्हणून घरातून गेला होता. सकाळी साडेनऊ वाजता हरीओम घरी आला नाही म्हणून त्याची आई याने त्याच्या मोबाईल फोनवर फोन केला असता तो मोबाईल फोन पोलिसांनी उचलला त्यांनी यावेळी सांगितले की तुमचा मुलाने सुंदर सृष्टी समोरील मार्वलइन एम्पायर सोसायटी मधील नवीन इमारतीवरून उडी मारली आहे. त्यानंतर त्याच्या आईने त्याच्या वडिलास फोन करून सांगितले त्याचे वडील गजानन बाळे घटनास्थळी गेले असता त्यांचा मुलगा बिल्डिंग खाली निपचित पडला होता व त्या ठिकाणी पोलीस नागरिक जमा झालेले होते. त्यानंतर त्याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मयत हरिओम हा दहावी इयत्तेत शिकत होता.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल कोथळकर करीत आहे.
