( प्रतिनिधी ) विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीतून सुसंस्कृत, सुदृढ व कौशल्याधिष्ठित पिढीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिरुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणच्या समारोपप्रसंगी बोलताना शिरुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके बोलत होते,
याप्रसंगी शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्ताराधिकारी किसन खोडदे, डेक्कन एज्युकेशनचे डॉ. समीर ओंकार, संदीप क्षीरसागर, शहाजीराजे पवार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे, जिल्हा समन्वयक प्रदीप देवकाते, संतोष क्षीरसागर, अशोक कर्डिले, राजेंद्र चोरे, आदिनाथ कर्डिले, कैलास पडवळ, मनोज नाईकवाडी, संतोष खताळ, बबन गुंड, राहुल आवारी, रामचंद्र नवले, दशरथ आळवे, प्राची कुलकर्णी, गणेश बांगर, संजना गावडे, स्नेहा खरबस, सारिका चव्हाण, प्रशांत माने, पी. ए. कुलकर्णी, चंद्रशेखर काकडे, ज्योती जाधव, बेबी तोडमल, जयश्री भुजबळ, शरयू कांबळे, सुनील भूकन, संतोष गावडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीतून कौशल्याचे विकसन करणारी आणि ती कौशल्य आत्मसात करणारी पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या माध्यमातून हे सहज शक्य होणार असल्याचे देखील गट विकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तालुक्यातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी समाजातील अनेक घटकांना बरोबर घेऊन आपण हे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवू असे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर राजेंद्र चोरे यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणच्या समारोपप्रसंगी गटविकास अधिकारी महेश डोके व आदी.