सणसवाडीच्या जय अंबीका कला केंद्राचे लावणी महोत्सवात यश...अकलूज लावणी महोत्सवात आठव्यांदा मिळवला क्रमांक

9 Star News
0
सणसवाडीच्या जय अंबीका कला केंद्राचे अकलूज लावणी महोत्सवात दुसरा  क्रमांक
शिरूर,प्रतिनिधी 
 सणसवाडी ता. शिरुर येथील जय अंबीका कला केंद्राने लावणीला राजाश्रय मिळावा म्हणून २००५ पासून सुरू झालेल्या अकलूज लावणी महोत्सवात सहभाग घेत जय अंबीका कला केंद्राच्या शितल - पुजा भूमकर पार्टीने दूसरा क्रमांक पटकावत अकलुज लावणी महोत्सवात तब्बल आठ वेळा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळाला असून यावर्षी या खुर्चीची मोहमाया बाई गं, राजकारण गेलं वाया गं या छक्कडने अकलूज महोत्सव गाजवल्याने या छक्कडमुळे यावर्षी यश मिळाल्याचे पुजा भूमकर यांनी सांगितले.  
                          सणसवाडी ता. शिरुर येथील जय अंबीका कला केंद्रात पारंपारीक लावणीच्या एकोणीस पार्ट्या असून लावणीच्या व्याख्या बदलू नये म्हणून येथे पारंपारीक लावणी कलाकार झगडत वर्षभर अकलूज लावणी महोत्सवाची तयारी करतात. यापूर्वी २००५ मध्ये सुरू झालेल्या अकलूज लावणी महोत्सवात जय अंबीका कला केंद्राच्या रेष्मा - वर्षा परितेकर पार्टीने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला तसेच २००८ मध्ये महालावणी महोत्सवात सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला, त्यांनतर २०२१ मध्ये पौर्णिमा - मयुरी नगरकर पार्टीने व २०२४ मध्ये वैशाली समसापूरकर पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला, सर्व कलाकारांकडून पारंपारीक लावणी करवून घेण्याचे संपूर्ण श्रेय हे कलाकेंद्र संचालिका सुरेखा हनुमंतराव पवार यांचे असल्याचे कलाकार सांगतात. नुकतेच अकलूज लावणी महोत्सवात छक्कड जुगलबंदी प्रकारातील सादरीकरणात शितल - पुजा भूमकर पार्टीने राज्याच्या चालू राजकारणावर या खुर्चीची मोहमाया बाई गं, राजकारण गेलं वाया गं या छक्कडने धुमाकुळ घालत संगीतकार चंदन कांबळे यांनी कंपोज केलेल्या लावणीत पुजा काळे भूमकर, शितल काळे भूमकर, नम्रता काळे, वनिता शिंदे, ज्योती लाखे, रेश्मा शेख, सारिका जाधव, गिता बनसोडे, उमा काळे, भक्ती मुसळे, संध्या चंदन, प्रतिक्षा वाघमारे, वैष्णवी मुसळे यांसह तबलावादक सुनिल जावळेकर, ढोलकीवादक सुमित कुडाळकर, पेटीवादक सुरदास कुडाळकर, बालाजी अंधारे, कैलास सरोज आदींनी कला सादर करत यश संपादित केले.
स्वतंत्र चौकट १ -
पारंपारीक लावणी जपल्याचे समाधान - सुरेखा पवार. . . . . .
लावणीच्या नावाखाली सध्या जे काही सादर होतेय त्यामुळे लावणी बदनाम होतेय. आम्ही कित्येक वर्षे पारंपारीक लावणीसाठी झगडतोय मात्र असे यश मिळाले की, आमचे कष्ट वाया जात नाहीत याचे प्रचंड समाधान मिळते असल्याचे जय अंबीका कला केंद्राच्या संचालिका सुरेखा हनुमंतराव पवार यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – सणसवाडी ता. शिरुर येथील जय अंबीका कला केंद्राचे अकलूज लावणी महोत्सवात दुसरा क्रमांक मिळवणारे कलाकार.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!