दानशूर उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या ८६ व्या जयंती निमीत्त शिरूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्यां रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून या लकी ड्रॉ मध्ये ८६ सायकली ठेवण्यात आल्या आहे.
हे रक्तदान उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ शिरूर शहर व पंचक्रोशी यांच्या वतीने व पुणे नगर येथील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे रक्तदान असणार आहे
दरवर्षी प्रमाणे यंदाही स्व. रसिकभाऊ धारिवाल यांच्या जयंती निम्मित शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल,युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिरात शिरूर शहर पंचक्रोशी शिरूर तालुका पारनेर श्रीगोंदा तालुका येथील
तरुण ,पुरुष, महिला, कॉलेज तरुण-तरुणी व नागरिकांना सहभाग घ्यावा असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
त्यांच्यासाठी ऑनलाइन नोंदणी व रक्तदानाच्या दिवशी सुद्धा नोंदणी करण्यात येणार असल्याची सांगण्यात आले आहे.
मागील वर्षी प्रमाणे यंदावर्षीही रक्तदात्यांसाठी प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह व लकी ड्रॉ च्या माध्यमातून ८६ सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
रक्तदान... श्रेष्ठदान...युवा पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व प्रदूषण कमी व्हावे, सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी या रक्तदान शिबिरामध्ये सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.