शिरूर तालुक्यातून ६ हजार ४९३ विद्यार्थ्यांची दहावी परीक्षेस बसले... सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
          शिरूर तालुक्यातून ६ हजार ४९३ विद्यार्थ्यांची दहावी परीक्षेस बसले असून या सर्व विद्यार्थ्यांना 
 परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन विद्यार्थी स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेस शिरूर मधून विविध परीक्षा केंद्रावर ६ हजार ४९३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याचे परिरक्षक तथा शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्या आवाहनानुसार परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिरूर तालुक्यातील प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे परिरक्षक बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात एकूण १५ परीक्षा केंद्र असून माध्यमिक विद्यालय सणसवाडी या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षी नव्यानेच परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे तरशिरूरमध्ये बारावी परीक्षेबरोबर इयत्ता दहावी परीक्षा सुरळीत सुरू असल्याचेही कळमकर यांनी सांगितले.

" परीक्षा केंद्राचे संपूर्ण नियंत्रण शिरूर येथून होत आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे साहित्य ने-आण करण्यासाठी रनरची व्यवस्था केलेली आहे. शिरूरमध्ये विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (७०३), विद्याधाम प्रशाला शिरूर (६६२), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (६०४), श्री मलिकार्जुन विद्यालय न्हावरे (५५३), गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (५३०), श्री भैरवनाथ विद्यालय करडे (५२१), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (४९७) छत्रपती माध्यमिक विद्यालय कोरेगावभीमा (४०९), बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय टाकळीहाजी (३५७), माध्यमिक विद्यालय सणसवाडी (३५७), छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव (३३६), छत्रपती शिवाजीराजे विद्यालय वडगाव रासाई (३२९), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (३१४), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (२१९), सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालय केंदुर (१०२) या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी प्रविष्ठ असून ३३४५ मुली आणि ३१४८ मुले परीक्षा देत आहेत.
        सर्व परीक्षा केंद्रावर आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त, पाणी, विजेची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करण्यात आली आहे. कुठेही कॉपी होणार नाही याची खबरदारी सर्व केंद्र संचालकांनी घेतली असून पारदर्शक पद्धतीने आणि आनंदायी वातावरणात परीक्षा विद्यार्थी देत आहेत."
 मारुती कदम
 सचिव- शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ.

श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय करडे या ठिकाणी केंद्रसंचालक श्रीहरी गोवंडे सहकेंद्रसंचालक मारुती कदम आणि दादाभाऊ घावटे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून परीक्षा आणि कॉपीमुक्त अभियान विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
          यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन परीक्षेत शुभेच्छा दिल्या. या परीक्षा केंद्रावर भांबर्डे, आंबळे, निमोणे, गोलेगाव, सरदवाडी,कारेगाव आणि करडे अशा सात माध्यमिक विद्यालयांची विद्यार्थी परीक्षा देत असून एकूण ५२१ विद्यार्थी प्रविष्ठ झाल्याची माहिती केंद्र संचालक श्रीहरी गोवंडे यांनी सांगितले.
     उपपरीक्षक म्हणून जिजाबापू गट व श्रीकांत निचित हे काम करत आहेत. माननीय मुख्यमंत्री यांच्या कॉपीमुक्त अभियानानुसार शंभर दिवस उपक्रम अंतर्गत सर्व केंद्रावर कॉपी होणार नाही, यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती केलेली आहे. सर्व केंद्रावर भेट देण्यासाठी विस्तार अधिकारी किसन खोडदे, रघुनाथ पवार , काळूराम चकोर, वंदना शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे. 
स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या ८६ व्या जयंती निमित्त शिरूर नगरपालिका येथे महारक्तदानाचे आयोजन केले आहे.
वेळ : सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत शनिवार ०१ मार्च २०२५

कृपया रक्तदात्यांनी आपले नाव आणि मोबाईल नंबर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्टर करावे धन्यवाद.
👇👇👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfNk_FMoGAMV6EVdlbF0Q9Xcg4DouiTkO57yR-RndGIdn1fAw/viewform?usp=dialog

अधिक माहिती साठी संपर्क : 7775857629 / 9049202121 / 9881214491
       https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfNk_FMoGAMV6EVdlbF0Q9Xcg4DouiTkO57yR-RndGIdn1fAw/viewform?usp=dialog

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!