शिक्रापुरात कंटेनरला धडकून एक ठार एक जखमी

9 Star News
0
शिक्रापुरात कंटेनरला धडकून एक ठार एक जखमी
शिरूर प्रतिनिधी 
      शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे चार दिवसां[पूर्वी पाण्याच्या टँकरखाली कार शिरुन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडलेली असताना त्याच ठिकाणी कंटेनरला धडकून दुचाकीवरील आकाश साहेबराव गेजगे हा ठार तर त्याचा साथीदार बंडू बाळासाहेब गोते हा जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत महेंदर यादव या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
                  शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून आकाश गेजगे व बंडू गोते हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ डब्ल्यू एन ३७६९ या दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेले असताना बजरंगवाडी येथे पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या एम एच ४६ सि एल ०१८७ या कंटेनर चालकाणे अचानकपणे पुन्हा पुणे दिशेने वळण घेतल्याचे कंटेनरच्या मागील बाजूस दुचाकीची गेजगे व गोते यांच्या दुचाकीची धडक बसून दुचाकी रस्त्यावर पडत कंटेनरखाली गेली, दरम्यान दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी होऊन झालेल्या सदर अपघातात आकाश साहेबराव गेजगे वय ३३ वर्षे रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे मूळ रा. सुरळवाडी ता. गंगाखेड जि. परभणी यांचा मृत्यू होऊन बंडू बाळासाहेब गोते वय ५० वर्षे रा. येवलेवस्ती पेरणे ता. हवेली जि. पुणे हे जखमी झाले असून याबाबत राजाभाऊ सखाराम गेजगे वय २८ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रणजीत महेंदर यादव वय २५ वर्षे रा. देवारा हरदपुरा ता. महाराजगड जि. आजमगड उत्तरप्रदेश या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे कंटेनरखाली अडकलेली दुचाकी.
सोबत – मयत आकाश गेजगे यांचा फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!