( प्रतिनिधी ) सविंदणे ता. शिरूर येथील नाथनगर येथे शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना अंदाज चुकल्याने बिबट्या थेट शेळीसह विहिरीत पडल्याची घटना घडली मात्र त्यांनतर वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत सदर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पिंजर बंद केले
सविंदणे ता. शिरूर येथील नाथनगर येथे पहाटेच्या सुमारास माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभू सावळेराम नरवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्या हल्ला करून घेऊन जात असताना त्याला विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारून जाताना बिबटया थेट शेळीसह विहिरीत पडला त्याच्या आवाजाने शेजारील शेडमध्ये झोपलेला इसम जागा झाल्याने त्याने विहिरीची पाहणी करत घडलेला प्रकार नागरिकांना सांगितले त्यावेळी रामदास नरवडे यांसह आदींनी विहिरीत डोकावले असता बिबटया विहिरीत जिव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे तर शेळी पाण्यात मृत झाल्याचे दिसल्याने त्यांनी याबाबतची माहिती शेजारील पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळूंज यांना दिल्याने त्यांनी आंबेगाव वनविभागच्या नियतक्षेत्र अधिकारी साईमाला गिते व शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांना दिल्यानंतर शिरुरचे प्रभारी वनपरिक्षेत्र विकास अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडल अधिकारी भानूदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांसह रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले आहे.
फोटो खालील ओळ – सविंदणे ता. शिरुर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना वनविभागचे कर्मचारी व नागरिक.