शिरूर ( प्रतिनिधी ) शिरुर शहरात प्रीतम प्रकाश नगर येथे शिवम हॉटेल कामगाराला दुचाकीहून सोडण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून हॉटेल समोर जाऊन हॉटेल मॅनेजरला कोयता दाखवून मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडुन कोयता जप्त केला आहे.
शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड (तिघे रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर ता शिरूर जि पुणे ) यांना अटक केली आहे.
याबाबत सुरेश शंकराव भांगे वय ६१ वर्ष, रा. गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरुर पोल्सिंत फिर्याद दिली आहे .
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान
शिरुर शहरातील पाबळ फाटा येथून शिवम हॉटेलचा कामगार हकिक खान हा दुचाकीहून जात असताना प्रदीप गायकवाड याने त्याला अडवून प्रीतमनगर येथे सोडण्यासाठी दमदाटी केली तेथे आणून सोडल्यानंतर हकिक हा घाबरून शिवम हॉटेलकडे गेला त्यांनतर शहीद शेख, सोनू उर्फ अशपाक शेख व प्रदीप गायकवाड हे तिघे पुन्हा पाच वाजता हॉटेल मध्ये कोयता घेऊन येऊन शिवीगाळ, दमदाटी करत हॉटेल कामगारांना धमकी देत हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याला कोयत्याने मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवत निघून गेले.याबाबत हॉटेल चालक सुरेश भांगे यांनी शिरुर पोलिस स्टेशन फिर्याद दिल्याने पोलिसांनी शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड या तिघांवर भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हे दाखल केले होते, त्यांनतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवलदार नाथसाहेब जगताप, सचिन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी शिरुर शहरातील रेणुका माता मंदीर परिसरात सापळा रचून शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड तिघे रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर ता शिरूर जि पुणे यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कोयता जप्त करुन अटक केली सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करत आहे.
फोटो खालील ओळ – शिरुर शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांना कोयत्यासह ताब्यात घेणारे पोलीस पथक.