शिरूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती भाषणे... पोवाडे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा... ढोल लेझीमच्या गजर भव्य मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय ची घोषणा अंगावर शहारे आणि शिरूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वातावरण शिवमय झाले आणि 
  व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात विविध उप्रकम राबऊन साजरी करण्यात आली.
       कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणण्यात आला.
           स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, त्याच्या पराक्रमावर,भाषणे नृत्य सादर केले.पोवाडे गायले गेले.लेझिम ,ढोल वाजवत मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने वातावरण आनंदमय झाले होते.
       यावेळी पालक तथा रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी रुजवले पाहिजेत.त्यांचा एक गुण म्हणजे पर स्त्री विषयी नेहमी माते समान आदर ठेवला पाहिजे.शाळेत प्रत्येक मुलीला बहीण समजले पाहिजे.व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेहमीच आदर्शवत उपक्रम होत असतात,आजचा हा शिवजयंती उत्सव खूप जल्लोषात विद्यार्थ्यांनी साजरा केला,सर्वांचे मनापासून अभिनंदन, व सर्वांना शिवजयंतीचा शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या.
        व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन विकास पोखरणा म्हणाले विद्यार्थ्यांचा कलागुणांचे कौतुक केले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कितीही बोलले तरी वेळ कमीच पडेल असे त्यांचे महान कार्य होते,त्यांचे नियोजन हे अचूक असायचे.राजमाता जिजामाता सारखे संस्कार पालकांनी मुलांना दिले पाहिजे असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
          यावेळी पूजा पोखरणा ,पालक,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने करून,कार्यक्रम यशस्वी केला.सर्वांचे आभार मानण्यात आले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!