कानुन के हाथ लंबे होते है.....अखेर स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
आरोपी दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पण त्याला जेवायला मिळत नव्हतं. भूकेनं व्याकूळ झाल्यानंतर आरोपी पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला होता अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध घेतला.
अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना हालचाल दिसली आणि स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली.
शेवटी रात्री एक वाजता, तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी दबक्या पावलांनी त्याच्या दिशेने वाट काढली. काही क्षणातच त्याला ताब्यात घेतलं. ७० तासांच्या शोध मोहिमेला पोलिसांना अखेर यश मिळालं आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. बलात्कार करून घरी आलेल्या आरोपीनं दुपारपर्यंत घरी आराम केला आणि संध्याकाळी कीर्तनातही सहभाग घेतला. देवाच्या नावाचा गजर कानावर पडत असताना, त्याने स्वतःच्या पापांचा भार हलका करायचा प्रयत्न केला. पण नियती त्याच्या मागावर होती.
रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला भूक लागली होती. तिथं दत्तात्रय गाडेनं जे काय केलं, त्याचा पश्चाताप झाल्याचं म्हटलं. याशिवाय गाडेनं प्रचंड भूक लागली असून काही तरी खायला द्या असं सांगितलं. नातेवाईकांनी काही खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. त्यानंतर गाडे त्या घरातून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी यासगळ्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची पूर्ण टीम अॅक्टिव्ह झाली, डॉग स्कॉड आलं, 13 टीम तैनात झाल्या. दत्तात्रय गाडे दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. उसात जाऊन पोलिसांनी गाडेला अटक केली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
दत्तात्रय गाडे तीन दिवस गुनाटमध्येच
मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे यानं स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी गेला होता अशी माहिती आहे. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली असल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आल्याची माहिती आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनला त्याचा जबाब नोंदवून घेतला जात होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याला सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाईल.