शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर सर्रास झाला असून, नुकतेच पिंपळे जगताप तांबे वस्ती येथे एका घरामध्ये घरात बसलेली तरुणी व दारात कुत्रा एवढ्यात बिबट्याने चोर पावल्याने येऊन घराचे संरक्षण करणाऱ्या कुत्र्यावर हल्ला करुन एक कुत्रा पळवला तर दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर हल्ला चढवला यामुळे उघड्या दारात घराच्या कॉटवर बसलेली तरुणीचे प्राण वाचले आहे. या घटनेत कुत्र्याने आपला जीव बिबट्याच्या स्वाधीन करून घरात बसलेल्या तरुणीचे प्राण वाचून आपल्या वफादारीची चुणूक स्वतःचे प्राण देऊन दाखवली आहे.
हा सर्व प्रकार पिंपळे जगताप ग्रामपंचायत सदस्य दिपाली राजेंद्र तांबे याच्या घरात घडला आहे.
सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाल्याने ही घटना कळाली आहे.ही घटना पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.
यामुळे बिबट्याचा सर्रासच्या वावराने घरातील मुले, शेतकरी महिला, पुरुष आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.
काल दिनांक ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडे सात वाजता पिंपळे जगताप येथील तांबे कुटुंबांच्या दारात पाळलेला कुत्रा बांधलेला होता. तर उघड्या दरवाजा घराच्या आत मध्ये राजेंद्र तांबे यांची भाची बसलेली दिसून येत आहे. याच वेळेस दबक्या पावलाने बिबट्याच्या आगमन झाले दारात बसलेल्या दोन श्वानावर त्याने हल्ला केला यात एक कुत्रा घेऊन बिबटया पळाला परंतु दुसऱ्या श्वानाच्या ओरडण्याचे आवाजामुळे व प्रतिकारामुळे बिबट्या आल्या पावली शिकार घेऊन पळून जात असलेले दिसून येते. व बिबट्याचे पाठीमागे दुसरे कुत्रे गेले. घराच्या कॉटवर बसलेली तरुणी उठून कुत्र्याच्या ओरडण्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. परंतु इमानदार कुत्र्याची शिकार मिळाल्याने बिबट्या शिकार घेऊन फरार झाला होता.
परंतु या तरुणीला काय माहिती की काही क्षणापूर्वी त्यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला होता. त्याला घेऊन गेला परंतु श्वानाच्या ओरडण्याने आणि प्रतिकारामुळे बिबट्या आल्या पावली पळाला परंतू श्वानाने आपला जीव बिबट्याचा ताब्यात दिला परंतू घरातील तरूणी व मामाच्या दोन लहान मुली यांचा जीव वाचवला आजही कुत्र्याने आपल्या जीव देऊन वफादार इमानदारी पणा दाखवला असेच म्हणावे लागेल.
बिबट्या श्वाना ऐवजी घरात घुसला असता तर आपल्याही जीवाचे काही बरे वाईट झाले असते. परंतु म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे आज घरात बसलेल्या तरुणी व दोन लहान मुली यांचे प्राण वाचले आहे. परंतु वफादार कुत्र्याने आपल्या जीवाची बाजी लावली.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्याने कळली आहे.
परंतु घराबाहेर रात्रीच्या वेळेस येणारा बिबट्या पशुधनावर हल्ले करत असत आता घरातही घुसू लागला आहे.हे या घटनेवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतात राहणारी शेतकरी शेतमजूर यांनी स्वतःची काळजी आता स्वतः घेणे गरजेचे आहे कारण वाढती बिबट्यांची संख्या जीवावर बेतू शकते कारण या अगोदरही शिरूर तालुक्यात लहान मुलापासून पासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या जीवावर बिबट्या उठला आहे त्यात त्यांचे प्राणही गेले आहे.
दिपाली व राजेंद्र तांबे ह्या नातेवाईकांच्या पूजेसाठी गेले होत्या तर त्यांचे सासरे दादासाहेब हे मित्रांकडे गेले होते त्याच वेळेस त्यांच्या घरात त्यांची भाची व दोन मुली होत्या त्याच वेळेस बिबट्याने हा हल्ला केला . यामुळे आमच्या मुलींचे प्राण वाचले परंतु वफादार आमचा श्वान जीवाला मुकला आहे. बिबट्या आता घरात येऊ लागल्याने या भागात वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी दिपाली तांबे ग्रामपंचायत सदस्य पिंपळे जगताप यांनी केली आहे.
बिबटया याअगोदर शेतात दिसायचा त्यांनतर तो घराबाहेर आला आता बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता तो आता घरात आला आहे. त्यामुळे लहान मुले शेतकरी महिला पुरुष यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून लवकरच या भागात वन खात्याने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी पिंपळे जगतापच्या पोलीस पाटील वर्षा थिटे यांनी केली आहे.