स्वारगेट पुणे येथे तरुणीवर अत्याचार करणारा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील नराधामाची माहिती देणाऱ्या एक लाखाचे बक्षीस

9 Star News
0
स्वारगेट पुणे येथे तरुणीवर अत्याचार करणारा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील नराधामाची माहिती देणाऱ्या एक लाखाचे बक्षीस
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
         स्वारगेट पुणे येथील बस मध्ये तरुणीवर अत्याचार करणारा दत्ता रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट तालुका शिरूर)या आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने एक लाख रुपयाचे बक्षीस पोलीस प्रशासनाचे वतीने देण्यात येणार असून, त्यांच्या कडून अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
           स्वारगेट येथे एसटी बस मध्ये तरुणीवर बलात्कार करून हा आरोपी गेल्या दोन दिवसांपासून फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातील पोलीस पथके जंग जंग पछाडत आहे. परंतु या आरोपीचा तपास अजून लागलेला नाही. 
             त्यामुळे पोलीस प्रशासनाने या आरोपीचा पत्ता माहिती सांगणाऱ्यांसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. 
           शिरूर तालुक्यातील गुनाट येथील हा दत्ता रामदास गाडे आरोपी असून हा सराईत गुन्हेगार आहे. तर हा आरोपी शिरूर एसटी बस स्टॅन्ड, शिरूर परिसरातील लॉज, या ठिकाणी कायम घुटमळत असायचा काही नागरिकांच्या चर्चांमधून समजले आहे. तेथेही काही मुलींचा किंवा महिलांचा मागे जात असायचा त्यामाध्यमातून काही गुन्हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही?
           
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!