रथसप्तमी निमीत्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर आयोजित केलेल्या आंतर शालेय सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धेत विविध शाळांच्या १७ संघामधून ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.यामध्ये शिरूर शहरातील दहा शाळांमधील मुलांचे ९ संघ व मुलींचे ८ संघ सहभागी झाले.
या स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा विभाग प्रमुख खेमराज रणपिसे, तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यपीठाचे क्रीडा संचालक स्वप्नील देशमुख यांच्या हस्ते झाले.
या उद्धाटन कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार , शालेय सल्लागार समितीचे सदस्य दत्तात्रेय धोंगडे, गणेश मराठे, नाना पोटे , संध्या कुलकर्णी तसेच बालाजी विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , डेक्कन स्कूल पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक डायना बोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी रणपिसे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून दादासाहेब उदमले, स्वप्नील देशमुख, राजेंद्र वर्पे व अपर्णा वाळसे यांनी काम पाहिले.
स्पर्धे दरम्यान पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरूर चे प्राचार्य श्निरज राय , नगरपालिका शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका उषाताई वेताळ , शाळेस भेट दिली. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन डेक्कन स्कूल शिरूर चे क्रीडाशिक्षक चंद्रकांत झांजे यांनी केले. तसेच
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
मुली
प्रथम क्रमांक - डेक्कन स्कूल शिरूर
द्वितीय क्रमांक - विद्याधाम प्रशाला शिरूर
तृतीय क्रमांक - शिरूर नगरपरिषद शाळा क्रं. ५
उत्तेजनार्थ पारितोषिक - पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर.
मुले
प्रथम क्रमांक - डेक्कन स्कूल शिरूर
द्वितीय क्रमांक - पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर
तृतीय क्रमांक - बालाजी विश्वविद्यालय, शिरूर
उत्तेजनार्थ पारितोषिक - शिरूर नगरपरिषद शाळा क्रं.१