शिरूर
( प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील युवती शिक्रापूर येथे क्लासला येत असताना तिच्या मैत्रीच्या माध्यमातून कुणाल राऊत याच्या सोबत ओळख झाली, त्यांनतर कुणाल याने युवतीशी ओळख वाढवून तिच्यासोबत काही फोटो काढले, दरम्यान कुणालला दारुसह अन्य व्यसन असल्याचे समजल्यानंतर युवतीने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली मात्र त्यांनंतर कुणाल वारंवार युवतीचा पाठलाग करुन तुझे फोटो व्हायरल करेल, तुझे कुठे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देऊन विनयभंग केला, याबाबत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कुणाल एकनाथ राऊत रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार किरण निकम या करत आहे.
