कोंढापुरी कोरेगाव भीमा शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्य पुणे नगर महामार्गालगत कोंढापुरी व कोरेगाव भीमा परिसरात पान शॉपवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान बनवले जात असल्याने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने पान शॉपवर छापे टाकत पान मसाले व पावडर जप्त करुन दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी कासारी फाटा येथील मल्हार पान शॉप चालक शुभम गोरक्ष वीर (वय २५ वर्षे रा. नवले वस्ती कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) व कोरेगाव भीमा येथील जय मल्हार पान शॉप चालक शाहरुख रफिक शेख ( वय २२ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोंढापुरी येथील कासारी फाटा भागात मल्हार पान शॉप व कोरेगाव भीमा येथे जय मल्हार पान शॉपवर नशा व गुंगीकारक पद्धतीचा मसाला टाकून पान बनवले जात असून युवकांमध्ये त्याचे जास्त आकर्षण असून शाळकरी व महाविद्यालयीन युवके मोठ्या प्रमाणात या पानांच्या आहारी गेलेले असताना सदर पान धोकादायक होऊ शकत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, महेंद्र पाटील, बापू हाडगळे, विकास सरोदे, हनुमंत गिरमकर, योगेश आव्हाड यांनी कोंढापुरी येथील कासारी फाटा भागात मल्हार पान शॉप व कोरेगाव भीमा येथे जय मल्हार पान शॉप येथे छापे टाकत पाहणी केली असता सदर पान शॉपमध्ये कोणतेही नाव अथवा लेबल नसलेले प्रतिबंधित पान मसाले व पावडर वापरुन पान बनवले जात असल्याचे निदर्शनास आले, दरम्यान पोलिसांनी पान शॉप मधील पान मसाले व पावडर जप्त करत त्यांचे नमुने अन्न व औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून याबाबत पोलिसांनी कासारी फाटा येथील मल्हार पान शॉप चालक शुभम गोरक्ष वीर (वय २५ वर्षे रा. नवले वस्ती कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) व कोरेगाव भीमा येथील जय मल्हार पान शॉप चालक शाहरुख रफिक शेख ( वय २२ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
पालकांनी लक्ष द्यावे – दिपरतन गायकवाड ( पोलीस निरीक्षक )
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक व पालकांनी याकडे लक्ष घेत आपल्या नवयुवकांना अशा कोणत्याही व्यसनाची बाधा होऊ नये याकडे लक्ष द्यावे तसेच असे प्रकार आढळून आल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर पोलिसांच्या पथकाने जप्त केलेले वेगवेगळे पान मसाले व पावडर.
