निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार मागे घेण्यासाठी मारहाण व दमदाटी तर घरावर दगडफेक केल्याप्रकरणी सहा जणांन विरोधात
शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रवींद्र छगण रणसिंग (वय ३२ वर्षे रा. निमगाव दुडे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ (सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजता निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केलेली सदर तक्रार मागे घेण्यासाठी नितीनचे काही नातेवाईक व मित्र वारंवार प्रयत्न करत आहेत, तर रवींद्र रणसिंग यांचे आतेभाऊ राजू थोरात हे टाकळी हाजी पेट्रोल पंप समोरून येत असताना नितीन गावडेचे मित्र बाबू वाळूंज सह त्याच्या साथीदारांनी राजू याला अडकून तू रवींद्र रणसिंगला नितीन गावडेची ३०२ ची केस मागे घ्यायला सांग असे म्हणून मारहाण केली, त्यांनतर रात्रीच्या सुमारास बाबू वाळूंज सह आदी व्यक्तींनी रवींद्र रणसिंग यांच्या घरासमोर येऊन रवींद्र रणसिंग यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून रवींद्र यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करत तू नितीनची केस मागे घेणार आहे का नाही असे म्हणून धमकी देऊन जात असताना बाबूच्या चुलत भावाने रवींद्र रणसिंग यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण हिसकावून ओढून नेले, याबाबत रवींद्र छगण रणसिंग वय ३२ वर्षे रा. निमगाव दुडे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथेb फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत गरकळ हे करत आहे.