( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरूर गावचे पोलीस पाटील राजेश गायकवाड हे गावातील वीरसाहेब मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिराच्या सभामंडपामध्ये एक अनोळखी झोपल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्या इसमाजवळ जाऊन पाहणी केली असता सदर इसमाची कोणती हालचाल होत नसून सदर इसम मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सदर इसमा बाबत गावात चौकशी केली असता काही माहिती मिळू शकली नाही, याबाबत पोलीस पाटील राजेश प्रकाश गायकवाड वय ५० वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली, तर सदर इसमाचे वय अंदाजे ५० वर्षे, रंगाने काळा, थोडे टक्कल, दाढी मिशा पांढरी व वाढलेली, अंगामध्ये निळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची नाईट पॅन्ट असे वर्णन आढळून आले असून सदर इसमा बाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९५११२९२३५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहे.
कोंढापुरीत मंदिरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
फेब्रुवारी २३, २०२५
0
कोंढापुरीत मंदिरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
शिरूर
Tags