विद्युत तारेच्या धक्क्याने ढोकसांगवी ता.शिरूर येथे बिबटयाचा मृत्यु, वातावरण भयभीत

9 Star News
0
तारेच्या धक्क्याने ढोकसांगवीत बिबटयाचा मृत्यु, वातावरण भयभीत 
शिरूर,प्रतिनिधी 
       ढोकसांगवी, ता.शिरुर येथील प्रगतिशील शेतकरी राजाराम भागुजी मलगुंडे यांच्या शेतात विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या खांबावर तारेचा धक्का लागून बिबट्याचा मृत्यु झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.बिबटया मृतावस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून,सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हा बिबटया दीड ते दोन वर्ष वयाचा (मादी) आहे. मलगुंडे यांचे अभंग मळा येथे शेत असून, या शेतात आज सोमवारी, दि.१७ सकाळी बिबट्याचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यु झाला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.या घटनेची माहिती रविंद्र मलगुंडे यांनी शिरुरचे वनपाल भाऊसाहेब शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी वन विभागाचे कर्मचारी जयेश टेमकर व वनरक्षक सविता चव्हाण तसेच महावितरणचे शाखा अभियंता दिपक पाचुंदकर, वायरमन वैभव शेवाळे व नामदेव घरत यांनीही घटनास्थळी भेट देवून सदर घटनेची सविस्तर माहिती घेतली,यावेळी वनपाल शिंदे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.त्यानंतर बिबटयाला (मादी) शिरुर येथील वन विभागाच्या कार्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
दरम्यान,मलगुंडे यांच्या याच शेतात गेल्या आठवड्यात ऊसतोडणी सुरु असताना तीन बिबटयाचे बछडे आढळून आले होते.
फोटो ओळ - ढोकसांगवी, ता.शिरुर येथे मृत अवस्थेत असलेला बिबटया
----------------------------------------

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!