शिरूर मध्ये नृत्य स्पर्धेचे आयोजन...

9 Star News
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर मध्ये नृत्य स्पर्धेचे आयोजन...
शिरूर ,प्रतिनीधी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरूर मधील खास हौशी व लहान मोठ्यांसाठी खास नृत्य स्पर्धेचे आयोजन शिरूर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. पूजा निलेश जाधव यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने भव्य अशा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन शिरूर शहरातील आर. पी. आय. चे अध्यक्ष निलेश जाधव व आशीर्वाद ग्रुपचे अध्यक्ष अखिल शेख यांनी केले होते.
       या स्पर्धेत एकूण 97 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान देशभक्तीपर गीतापासून ते लावणी पर्यंत या गाण्यांनी स्टेज दुमदुमला होता. तीन वर्षाच्या मुली पासून ते तीस वर्षाच्या महिलेपर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. सर्वात सुंदर नृत्य संदीप वावळ या ग्रुपचे झाले त्यांनाच ग्रुप डान्स मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. तर या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण अगदी छोटीशी म्हणजे तीन वर्षाची किट्टू सातपुते ही होती. 
      स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नगरसेवक विनोद भालेराव नगरसेविका रेशमा लोखंडे तसेच नगरसेविका पूजा जाधव व आरपीआयचे अध्यक्ष निलेश जाधव यांच्या हस्ते झाले. स्वागत अखिल शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव व सतीश व्यवहारे यांनी केले आभार शेखर बोरगे यांनी मानले.
     नृत्य स्पर्धांमध्ये सोलो डान्स, कपल डान्स, व ग्रुप डान्स आदी प्रकार होते. स्पर्धेचे परीक्षण डान्स अकॅडमी चे गायत्री सिंग व मोनिका कांबळे यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आरपीआयचे अध्यक्ष निलेश जाधव, नगरसेविका पूजा जाधव,अखिल शेख, सचिन खिल्लारे, शेखर बोरगे, रवींद्र जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. स्पर्धेत मिळालेली बक्षिसे पुढीलप्रमाणे.....
ग्रुप डान्स-
प्रथम क्रमांक- संदीप वाव्हळ आणि ग्रुप.
द्वितीय क्रमांक-आरोही खिटे.
तृतीय क्रमांक-अमायरा सय्यद. 
कपल डान्स-
प्रथम क्रमांक-संस्कृती गायकवाड, वृषाली पातारे.
द्वितीय क्रमांक-समिधा कांबळे, सई कांबळे
तृतीय क्रमांक-वैष्णवी पातारे, शिवानी सकट.
सोलो डान्स-
प्रथम क्रमांक- कार्तिकी बत्ते.
द्वितीय क्रमांक-अर्णव पाबळे.
तृतीय क्रमांक-स्वराज मांढरे.
यांनी मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम व नृत्य स्पर्धेची ट्रॉफी देण्यात आली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!