ढोकसांगवी ता.शिरूर येथील एस के एच कंपनी समोरील अभंग यांचे रूममध्ये कामगारांना मारहाण करुन त्यांना जेवायला न देता कोंडून ठेवून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला लावून त्यांचें पगार न देता त्यांचा छळ केल्याप्रकरणी चार जणांवर रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
आनंद दिगंबर वाघळकर ,सुनील दिगंबर वाघळकर, प्रशांत श्रावण साळवे,अक्षय काळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आनंद वाघाळकर व प्रशांत साळवे यांना अटक करण्यात आली असून आज रोजी शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.
याबाबत सुधाकर रामराव माखणे (वय 39 वर्ष, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २५ जानेवारी पूर्वी ते १ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी ढोक सांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील एस के एच कंपनी समोरील अभंग यांचे रूममध्ये फिर्यादी तसेच फिर्यादी सोबतचे इतर कामगार यांना कॉन्ट्रॅक्टर आनंद दिगंबर वाघळकर व सुनील दिगंबर वाघळकर,जेवण देणारे प्रशांत श्रावण साळवे व सुपरवायझर अक्षय काळे यांनी कंपनीमध्ये काम करण्यासाठी सदर कामगार आले असता त्यांना डांबून ठेवून, धमकावून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले तसेच केलेल्या कामाचे पैसे न देता कॉन्ट्रॅक्टर सुनील वाघळकर व सुपरवायझर अक्षय काळे यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे मागितले असता त्यांनी फायबरचे पाईपने पाठीत व कमरेवर मारहाण करून आप खुशीने साधी दुखापत केली आहे तसेच इतर कामगार यांना देखील वेळोवेळी मारहाण केली आहे. याबाबत फिर्यादीवरून रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे मारहाण करणे, डांबून ठेवणे, व वेठबिगारी कायदा कलम ४,१६ नुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल कऱण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहे.