शिरूर शहरातील जोशी वाडी येथे मैत्रिणी सोबत पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र स्कुटी गाडीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून नेल्याची घटना घडली असून याबाबत दोघांवर
रोड रॉबरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शितल विशाल झनकर (वय -27 वर्ष व्यवसाय - घरकाम रा. मुरलीधर नगर कानडी मळा सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक सध्या- राहणार एकदंत सोसायटी हनुमान मंदिराजवळ जोशीवाडी शिरूर) यांनी याबाबत क्रिया दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी शीतल या जोशी वाडी हनुमान मंदिर ते जुना हायवे रस्त्यापर्यंत दोन मैत्रिणी सोबत गणेश दूध डेरीच्या समोरून पायी जात असताना स्कुटी वरून आलेल्या दोघा अनोळखी तरुणांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आठ ग्रॅम वजनाचे किंमत २७ हजार ८४० चे जबरदस्तीने ओढून नेले आहे.
फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे दोघाजणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.